logo

भिमा कोरेगाव दंगल घडवणाऱ्या भिडेचा वर्धा येथिल आंबेडकरी जनतेच्या वतीने जाहीर निषेध वर्धा (महाराष्ट्र): भीमा कोरेगा

भिमा कोरेगाव दंगल घडवणाऱ्या भिडेचा वर्धा येथिल आंबेडकरी जनतेच्या वतीने जाहीर निषेध


वर्धा (महाराष्ट्र): भीमा कोरेगाव दिनी आंबेडकरी जनता शौर्यस्तंभला अभिवादन करण्यासाठी जात असतात, परंतु सन २०१८ ला अभिवादन करण्यास गेलेल्या आंबेडकरी जनतेवर मनोहर भिडे यांच्या माध्यमातून दंगल घडून लाखो जनतेला जखमी केले, त्याचा निषेध म्हणून १ जानेवारी ला सम्पूर्ण भारत बंद चे आयोजन करण्यात आले होते, त्याच मनोहर भिडे यांची सभा वर्धा जिल्हात असल्याची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी, भिम आर्मी संविधान रक्षक दल निर्माण सोशल फोरम, भारतीय बोद्ध महासभा, व आंबेडकरी जनतेच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून भिडे याच्या निषेध नोंदवला त्याची माहिती मिळत्याच पोलीस प्रशासनाने सर्व कार्यकर्ता यांना डिटेन करून शहर पोलीस ठाण्यात घेऊ गेल्याची बातमी मिळताच काही आंबेडकरी जनतेच्या वतीने त्याची सभा उध्वस्त करण्यास साठी गेले, नारे दिले परंतु त्याना ही पोलीस प्रशासनाच्या वतीने अटक करण्यात आली,
वंचित बहुजन आघाडी विदर्भ समन्वय किशोर खैरकार यांनी सांगितले की भीमा कोरेगावचा दंगल घडवणाऱ्या भिडेची सभा घेऊन जर उद्या जिल्ह्यात दंगल घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, ही सभा घेणाऱ्यानी निवडणूक च्या तोंडावर घेऊन दंगल घडवण्याचे षड्यंत्र तर नाही, वर्धा जिल्ह्यात नेहमी शांतता व सुव्यवस्था राहते परंतु सभेमुळे जाती दंगल घडल्यास एकत्र येणारी जनता मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे हा निषेध करण्यात आला असून या नंतर वर्धा जिल्हात भिडे सारख्याना येणास बंदी घालण्यात यावीअसे त्यानी बोलताना सांगितले, आंदोलना मध्ये, नीरजभाऊ गुजर निर्माण सोशल फोरम, आशीष सोनटक्के विदर्भ अध्यक्ष भिम आर्मी संविधान रक्षक विशालभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष भारतीय बोद्ध महासभा विशाल भाऊ शेंडे , नितीन इंदूरकर मनोज कांबळे, सतीश इंगळे, बंटी रंगारी, प्रजवल टेभरे, प्रशांत भित्रे अक्षय हुमने, आयुष, इत्यादी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

15
7475 views
  
1 shares